मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती अद्यापही सुरूच आहे. अशातच आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या सुरगाणा नगरपंचायतमधील सर्वच सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यांनी केला पक्षप्रवेश?
सुरगाणा नगरपंचायतमधील विद्यमान नगराध्यक्ष भारत वाघमारे, नगरसेविका पुष्पाताई वाघमारे, नगरसेविका अरुणाताई वाघमारे, नगरसेविका प्रमिलाताई वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
हे पण वाचाच..
शेतकऱ्यांनो सावधान! जळगाव जिल्ह्याला पुढील 3-4 तासांत महत्वाचे, IMD कडून अलर्ट जारी
मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती
तसेच दुसरीकडे नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवास्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आज शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. आपल्यावर विश्वास ठेवून या राज्यातील अनेक लोक शिवसेनेत सामील होत आहेत. सुरगाणा नगरपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो. माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांचा देखील खास स्वागत करतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.