पाचोरा : पाचोरा तालुक्यातून भाऊ आणि बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. सुट्यांमध्ये आजीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीवर नात्याने चुलत भावाने जबरदस्ती करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पीडीतेने पिंपळगाव हरेश्वर पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित चुलत भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमका काय आहे प्रकार?
पाचोरा तालुक्यातील एका गावातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी शालेय सुट्या असल्याने आपल्या आजीच्या घरी आली. 5 मे रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास या चुलत भावाने अल्पवयीन चुलत बहिण झोपलेली असतांना तिच्याशी अंगलट केल्यानंतर पीडीता जागी झाल्याने तिने विरोध केल्यानंतर आरोपीने गळा दाबून जबरदस्ती करण्याचा सुद्धा प्रयत्न केळा.
हे पण वाचाच..
पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची मोठी संधी..!
शेतकऱ्यांनो सावधान! जळगाव जिल्ह्याला पुढील 3-4 तासांत महत्वाचे, IMD कडून अलर्ट जारी
मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती
या प्रकरणी चुलत भाऊ विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.