मुंबई : सोने आणि चांदीच्या भावात चढउतार सुरुच असून आज पुन्हा एकदा भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा भाव 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो 74 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
सराफा बाजारानुसार, सोन्यात तेजीचे सत्र आले, भाव 60417 प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर चांदीचा भाव 74226 रुपये प्रति किलोवर पोहचला. या आठवड्यात मंगळवारी सोने 249 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. तर सोन्यासोबत चांदीने पण उसळी घेतली. मंगळवारी चांदी 358 रुपयांनी महागली. चांदीचा भाव 74226 रुपये प्रति किलोवर बंद झाला. शुक्रवारी चांदी 547 रुपयांनी स्वस्त होऊन 73868 रुपये प्रति किलोवर पोहचली.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 249 रुपयांनी स्वस्त होऊन 60417 रुपये, 23 कॅरेट सोने 249 रुपयांनी स्वस्त होऊन 60176 रुपये, 22 कॅरेट सोने 228 रुपयांनी स्वस्त होऊन 55342 रुपये, 18 कॅरेटचे सोने 186 रुपयांनी घसरले आणि 45312 रुपयांवर आले. 14 कॅरेट सोने 135 रुपयांनी स्वस्त होऊन 35343 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
हे पण वाचा..
राज्यातील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांना कोणती नवी जबाबदारी?
तुळशीशी संबंधित ‘या’ एका चुकीमुळे तुम्हाला आयुष्यभर गरिबीचा सामना करावा लागेल..
Video! मेट गाला पुरस्कार सोहळ्यात प्रियंका चोप्राच्या किलर लूकने वेधले सर्वांचे लक्ष
देशासाठी धोक्याचा इशारा..! बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ धडकणार
सोने 400 रुपये तर चांदी 5700 रुपयांनी स्वस्त
सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकी किंमतीपेक्षा 463 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. तर चांदी जवळपास 5754 रुपये प्रति किलोने स्वस्त मिळत आहे. सोने-चांदीने गेल्या 19 एप्रिलपासून मोठी झेप घेतलेली नाही. किमतीत चढउतार सुरु असून या मौल्यवान धातूवर आंतरराष्ट्रीय बाजाराच मोठा दबाव दिसून येत आहे.

