मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी अचानक अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानं कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या राजीनाम्यांनंतर राष्ट्रवादीत राजीनाम्याचे सत्र सुरु झाले आहे.
जयंत पाटलांनी NCP प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे.
शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केलानंतर नेत्यांसह कार्यकर्ते निराश झाल्याचं दिसून येत होतं. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या राजीनामा सत्रानंतर हा गोंधळ अधिक वाढल्याचं दिसून येत आहे.
हे पण वाचा..
सोने -चांदीच्या भावात चढउतार सुरुच ; आजचा काय आहे नवा दर? घ्या जाणून
राज्यातील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांना कोणती नवी जबाबदारी?
तुळशीशी संबंधित ‘या’ एका चुकीमुळे तुम्हाला आयुष्यभर गरिबीचा सामना करावा लागेल..
Video! मेट गाला पुरस्कार सोहळ्यात प्रियंका चोप्राच्या किलर लूकने वेधले सर्वांचे लक्ष
काय म्हटलं होतं पवारांनी?
मंगळवारी मुंबईत शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्ककाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. माझ्या खासदारकीचे तीन वर्ष राहिली आहेत, आता आणखी नवी जबाबदारी नको म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नव्या अध्यक्षांची निवड ही पक्षाच्या ज्येष्ठांच्या सल्ल्यानं व्हावी असंही पवार म्हणाले होते.

