चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील बोढरे शिवारामध्ये एका अज्ञात महिलेचा खून करून तिचा मृतदेह गोणपाटात भरून काटेरी झुडपात फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात वनपाल दीपक किशन जाधव यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दर्ग्यापासून अंदाजे दोनशे मीटर अंतरावर काटेरी झुडपात एका गोणपाटात मृतदेहाचे हाडे आढळून आले. एका अज्ञाताने महिलेचा खून करून मृतदेह आणून फेकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी पंचनामा करीत हाडाचा सांगाडा जप्त केला आहे.
हे पण वाचाच..
उपविभागीय अधिकारी भुसावळ कार्यालय येथे भरती ; पात्रतेसह जाणून घ्या किती पगार मिळेल..
…तर पुढील आठवड्यात सोने ६० हजारांवर जाणार? आज काय आहे जळगावात सोन्याचा भाव?
मुलीच्या भविष्याची चिंता सोडा..! फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार पूर्ण 65 लाख
गोणपाटात हाडे, केस, कवटी, महिलेची साडी, ब्लाऊज परकर तसेच बांगड्या असे आढळून आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दोन ते तीन महिन्यांपूर्वी महिलेची हत्या करुन मृतदेह गोणपाटात भरुन विल्हेवाट लावण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत.

