मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. शिवसेना चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे,’ असं ट्वीट करत संजय राऊत यांनी केलं आहे. यामुळे राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी नक्की कोणत्या आधारावर हा दावा केला आहे आणि या दाव्यामध्ये कितपत सत्यता आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईलच. मात्र सध्या तरी या राजकीय बॉम्बने चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा हादरला बसला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय देताना पक्षपातीपणा केल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यातच संजय राऊत यांनी मोठा खळबळजनक आरोप केला.
हे पण वाचा..
महाराष्ट्र हादरला ! 65 वर्षीय मुख्याध्यापकाने केला 14 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
जेवण करताना असता टोल कर्मचाऱ्याचा अवघ्या 2 सेकंदात झाला मृत्यू ; पहा मृत्यूचा LIVE VIDEO
कामाची बातमी! आता फाटलेल्या नोटा फुकटात बदला, पूर्ण पैसे परत होतील; RBI चा हा नियम वाचा
तयारीला लागा..! जळगाव महापालिकेत 336 पदे भरण्यास मंजुरी
संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हा गंभीर आरोप केला. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी दोन हजार कोटीचा व्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे लवकरच येतील. मी खात्रीने सांगतो ही डील झाली आहे. हा सौदा आहे. जो पक्ष नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना विकत घेण्यासाठी 50 लाख देतोय, आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी 100 कोटी देतात तो पक्ष शिवसेना हे नाव घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल याचा हिशोब लागणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

