जळगाव : नोकरीच्या शोधात असलेल्या जळगावातील बेरोजगारांना नोकरीची मोठी संधी चालून येणार आहे. कारण जळगाव महापालिकेत 336 पदे भरण्यास मंजुरी देण्यात आलीय. काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
जळगाव महापालिकेच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत २६३३ पदे मंजूर, तसेच महापालिकेने शिफारस केलेली ८४२ पदे व्यपगत करावयाची पदे वगळून व नवनिर्मितीची ३३६ पदांची वाढ विचारात घेऊन एकूण २१५७ पदांच्या आकृतिबंधास मंजुरी दिली आहे. पदासाठी सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी शासन कोणतेही अनुदान व निधी देणार नाही. तसेच आस्थापना खर्च ३५ टक्के मर्यादित ठेवणे आवश्यक असण्याची अट आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध होईल.
शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी आकृतिबंधास मंजुरी देऊन त्याबाबतचा अध्यादेश उपसचिव श. त्र्य. जाधव यांच्या स्वाक्षरीने काढला आहे. त्यात म्हटले आहे, की जळगाव महापालिकेच्या १२ ऑगस्ट २०२१ च्या महासभेत ठराव क्रमांक ५५० नुसार सुधारित आकृतिबंधास मंजुरी दिली आहे. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या रिक्त पदांची माहितीनुसार एकत्रित पद भरतीस मंजुरी दिली आहे. यात तब्बल ३३६ नवीन पदे निर्माण केली आहेत. याशिवाय ८४२ पदे व्यपगत केली आहेत. व्यपगत पदापैकी २४२ कर्मचारी सध्या कार्यान्वित असल्याने ते निवृत्त झाल्यानंतर ही पदेही व्यपगत करण्यात येतील. या पदासाठी वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार देण्यात येईल.
हे सुद्धा वाचा :
दहावी उत्तीर्णांनो घाई करा.. कर्मचारी निवड आयोगाकडून 11409 पदाची भरती, आज शेवटची संधी
जळगाव महापालिकेमार्फत या पदासाठी निघाली भरती ; ‘एवढा’ पगार मिळेल..
जिल्हा रुग्णालय धुळे येथे तब्बल 85,000 पगाराच्या नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज
पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. ‘या’ सरकारी बँकेत तब्बल 500 पदांसाठी निघाली भरती
४५० पदे भरती होणार
अशी आहेत पदे कंसात संख्या
कार्यकारी अभियंता (१), कार्यकारी अभियंता (जलनिस्सारण) (१), मुख्य अग्निशमन अधिकारी (१), नगररचनाकार (१), मूल्यनिधारक कर संकलन अधिकारी (१), उपअभियंता पाणीपुरवठा (१), उपअभियंता विद्युत (२), उपअभियंता स्थापत्य (१), उपअभियंता बांधकाम (४), सहाय्यक आयुक्त (३), प्रभाग आयुक्त अधिकारी (४), पर्यावरण संवर्धन अधिकारी (१), शहर क्षयरोग अधिकारी (१), जीवशास्त्रवेत्ता (१), सहाय्यक अभियंता विद्युत (१), सहाय्यक अभियंता घनकचरा व्यवस्थापन (१), सहाय्यक अभियंता (७), पशुशल्य चिकित्सक (१), उपमुख्य लेखा परीक्षक (१), लेखाधिकारी (१), समाजविकास अधिकारी (१), सहाय्यक मूल्यनिर्धारक कर संकलन अधिकारी (१), सिस्टीम मॅनेजर (१), प्रशासन अधिकारी (शिक्षण मंडळ) (१), कनिष्ट अभियंता (६), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (१), कनिष्ठ अभियंता मेकॅनिक (१), कनिष्ठ अभियंता ॲटोमोबाईल (१), कनिष्ठ अभियंता घनकचरा व्यवस्थापन (१), वैद्यकीय अधिकारी एम बबीएस (४), अग्निशमन केंद्र अधिकारी (३), कार्यालय अधीक्षक (४), माहिती जनसंपर्क अधिकारी (१), मिळकत अधीक्षक (१), मुख्य स्वच्छता निरीक्षक (४), संगणक तंत्रज्ञ (१), सुरक्षा अधिकारी (१), अग्निशमन उपाधिकारी (३), मेट्रन (अधीसेविका) (१), अतिक्रमण निरीक्षक (३), आरेखक ड्राप्समन (१), कर निरीक्षक (६), प्रमुख अग्निशमन विमोचक (२४), वरिष्ठ लिपिक (२०), स्वच्छता निरीक्षक (५), वाहनचालक यंत्रचालक (२८), अग्निशमन विमोचक (फायरमन)(१०), कीटक सहांरक (१), छायाचित्रकार (१), टेलीफोन ऑपरेटर (११), लिपिक (९), ड्रेसर (२), भालदार चोपदार (१), मलेरीया कुली (५), मेलेली जनावरे उचलणारे कामगार (४), शिपाई (२०), सफाई कामगार पुरुष व महिला (२६). याशिवाय आयुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रशासकीय कार्यालयात पदे आहेत.

