मुंबई : शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलीय.होस्टेलवर राहणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीवर 65 वर्षीय मुख्याध्यापकाने वारंवार अत्याचार केला. एवढंच नव्हे तर नराधमाने या घटनेबाबत कोणाशीही बोलू नकोस, अन्यथा तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू अशी धमकी दिली होती. दरम्यान, याबाबत नराधम मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीला आपल्या केबिनमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन करायचा. शाळेला लागूनच वसतिगृह असल्याने, मुख्याध्यापकांकडून अशा प्रकारे वारंवार छळ केला जात असल्याची माहिती आहे.
दरम्यान याबाबत पोलीस शाळेत जात तेथे राहणाऱ्या सर्व विद्यार्थिनींची चौकशी ही करत आहेत. नोव्हेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यापासून मुख्याध्यापक 7 वीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते. मुलीची लहान बहीण आणि लहान भाऊ देखील त्याच शाळेत शिकतात आणि त्याच वसतिगृहात राहतात. परंतु मुख्याध्यापकाच्या धाकामुळे ती मुलगी घाबरत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले
हे पण वाचा..
जेवण करताना असता टोल कर्मचाऱ्याचा अवघ्या 2 सेकंदात झाला मृत्यू ; पहा मृत्यूचा LIVE VIDEO
कामाची बातमी! आता फाटलेल्या नोटा फुकटात बदला, पूर्ण पैसे परत होतील; RBI चा हा नियम वाचा
तयारीला लागा..! जळगाव महापालिकेत 336 पदे भरण्यास मंजुरी
आम्ही त्यांच्याशी आणि वसतिगृहात राहणाऱ्या इतर 22 विद्यार्थ्यांशीही बोलणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या अमानूष छळाविषयी त्या मुलीने आई-वडिलांना भेटल्यावर घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे संपर्क साधला.
पालकांच्या तक्रारीच्या आधारे, मुख्याध्यापकांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, 2012 आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्याध्यापकालाही अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करणार आहोत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.