औरंगाबाद,(प्रतिनिधी)- व्ही. एन. पाटील विधी महाविदयालय व डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ औरंगाबाद, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत युवकाचा ध्यास ग्राम शहर विकास” सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे समारोप समारंभ मौजे रामपूर ता. जि. औरंगाबाद येथे पार पडला.
या कार्यक्रमास डॉ. प्रेमला मुखेडकर से. यो.गर समन्वयक डॉ. या आ.म.विदयापीठ व श्री ज्ञानेश्वर पार्थीकर (रा. से.यो. गर समन्वयक) यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच श्री. आगाजी डाठशा अंभोरे (सरपंच, रामपूर) श्री. मिलिंद एल पाटील (सल्लागार नवलभाऊ प्रतिष्ठान) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमा- च्या अध्यक्षा कॉलेजच्या प्राचार्या । शिल्पाराणी डोंगरे यांनी केली सात दिवसीय शिविराअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा कार्यक्रम आधिकारी प्रा. यशोदीप पवार यांनी सादर केले विशेष अतिथीनी गावकऱ्यांना व विद्यार्थीना मार्गदर्शन केले कार्यक्रमांची सांगता श्री मिलींद पाटील यांच्या भाषणान झाली गांवातील पुरुष व महिलानी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमान हजेरी लावली. डॉ. साबिया शेख, प्रा. चारुशिला कुलकर्णी प्रा. वैशाली थिटे, गमन पाटील, कुणाल पाटील यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.