जळगाव : जळगावच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्व परिचित आहेत. अनेक वर्षांपासून या दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र अशातच खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबाबत एक मोठं व्यक्तव्य केलं आहे.
कार्यक्षम, दूरदृष्टीचा आणि सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री असावा मात्र या निकषात जर आता गिरीश महाजन बसत असतील तर मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांना देखील माझा पाठिंबा असेल, असं मोठं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं. अचानक एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबद्दल असं वक्तव्य केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
सुरेश दादा जैन हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र मला जो मुख्यमंत्री पाहिजे आहे, तो कार्यक्षम, दूरदृष्टीचा व सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री पाहिजे.. माझं मत मी त्यावेळीदेखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे व्यक्त केलं होतं. असं जळगाव येथे आज एकनाथराव खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता यावेळी ते म्हणाले,
हे पण वाचा..
500, 1000 रुपयांच्या नोटानंतर आणखी एक नोट बंद? सरकारने घेतला मोठा निर्णय!
कोणताही निर्णय घेण्यास घाई करू नका ; वाचा काय म्हणते तुमची आजची राशी?
Video! स्वतःच्या मुलापासून गरोदर राहिली महिला, नवऱ्याला घटस्फोट देऊन मुलाशी केलं लग्न
दरम्यान आपल्या परिसरात विद्यापीठ पशुवैद्यकीय महाविद्यालय यासह सिंचनासाठीचा निधी मिळावा . आपला परिसर सुजलाम् सुफलाम् व्हावा यासाठी माझा आग्रह आहे. मग कितीही कट्टर दुश्मन असेल तरी मुख्यमंत्री पदासाठी माझा त्यांना पाठिंबा राहील असे मतही खडसेंनी व्यक्त केले आहे.

