खान्देशात भाजपला सर्वाधिक जागा
जळगाव ;- राज्याचे संकटमोचक मंत्री म्हणून प्रसिद्ध असलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पालघर , जळगाव मनपा , धुळे मनपा , जामनेर नगरपालिका या पाटोपाठ उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त जागा त्यांच्या नेतृत्वात निवडून आल्याने ते खर्या अर्थाने किंगमेकर ठरले असेच म्हणावे लागेल
. त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्रची जबाबदारी देण्यात आली होती . त्यानुसार त्यांनी रानटी आखत भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा चंग बांधला होता . खासकरून गिरीश महाजन यांनी जळगाव लोकसभेची जागा प्रतिष्ठेची केली होती खासदार एटी पाटील यांना तिकीट डावलल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती . तसेच आ. स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अमळनेरचे आ. शिरीष चौधरी आणि खासदार एटी पाटील यांनी बंड पुकारले होते . त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला आव्हान देणारा उमेदवार आ. उन्मेष पाटील यांना रात्रीतून स्मिता वाघ यांचे नाव वगळून उमेदवारी जाहीर केली होती . यामुळे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे नाराज झाले होते . तसेच अमळनेरच्या मेळाव्यात ना. गिरीश महाजन यांच्या समोरच उदय वाघ आणि माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यात हाणामारी झाली होती . मात्र दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याआधीच गिरीश महाजन यांनी सर्वाना मोठ्या कौशल्याने हाताळीत परिस्थिती आटोक्यात आणली होती . या हाणामारी प्रकरणाची माहिती दिल्लीपर्यंत पोहचली होती . याचा नाकारात्मक परिणाम भाजपला होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात होती . मात्र गिरीश महाजन यांनी बंड पुकारणाऱ्यांसह इत्ररांचा राग शमविला होता . आणि प्रचारादरम्यान योग्य नियोजन प्रभावी नेतृत्व , संघटन राबवून प्रचार यंत्रणा जोरात केली होती . याचा परिणाम म्हणून कि काय रावेर आणि जळगावचे दोन्ही खासदार ३ लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आले . जळगाव धुळे आणि जामनेर पालिकेनंतर गिरीश महाजन यांनी आपले नेतृत्व कौशल्य सिद्ध केले आहे . त्यांच्या नेतृत्वात खान्देशाची भाजपची वाटचाल जोमाने सुरु असून बालेकिल्ला शाबूत राखला आहे . आगामी विधानसभा निवडणुकांची जबाबदारीही गिरीश महाजन यशस्वीरीत्या पार पाडतील असेच म्हणावे लागेल … !