मुंबई : महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळताना दिसून येतेय. अशातच आज जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. आज सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आला आहे. दिल्लीत इंडेन सिलेंडर 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
कोûएलपीजी सिलेंडरचे दर कोलकातामध्ये 182 रुपयांनी, मुंबईत 190.50 रुपयांनी, तर चेन्नईमध्ये 187 रुपयांनी कमी झाले आहेत. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने (Indian Oil) व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही कपात केली आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. 14.2 किलोचा घरगुती सिलिंडर स्वस्त किंवा महागही झाला नाही. त्याचा दर आजही 19 मे रोजीच्या दराने उपलब्ध आहे.
मे महिन्यात दरवाढ
जूनमध्ये इंडेनचे व्यावसायिक सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दोनदा दणका बसला होता. घरगुती सिलिंडरच्या दरात 7 मे रोजी महिन्यात प्रथमच 50 रुपयांनी वाढवण्यात आली होती आणि 19 मे रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीतही वाढ करण्यात आली होती.