जळगाव : एकीकडे राज्यासह जळगाव जिल्ह्यात गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. अशात सध्या कोण काय करेल याचा नेम नाही. असाच विश्वास न बसणारा एक प्रकार जळगावमध्ये समोर आला आहे.
जे नागरिक कामानिमित्ताने बाहेरगावी असतात, त्या नागरिकांच्या मालमत्तेचा शोध घेवून मालक जर पुरूष असेल, बनावट पुरूष उभा करायचा आणि मालमत्तेचा मालक जर महिला असेल तर बनावट महिला उभी करुन तिचे बनावट कागदपत्रे बनवून मालमत्ताची खरेदीविक्री करणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी पर्दाफाश केला आहे. का महिलेसह दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेने शहरात प्लॅट खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय.
याबाबत अधिक असे कि, जळगाव शहरातील योध्या नगरात असलेल्या बखळ प्लॉट हा अनिता राजेंद्र नेहते यांचे नावे आहे. सध्या त्या कामानिमित्त बाहेरगावी राहतात. त्यांच्या ऐवजी बनावट महिला उभी करून त्यांच्या नावे असलेल्या २ दोन कोटी रूपये किंमतीचे तीन प्लॉट विक्री करण्याच्या प्रयत्नात होते. याबाबतची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना कारवाईच्या सुचना दिल्या.
हे पण वाचा..
‘या’ दिवसात चुकूनही पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये, अन्यथा..
विमानात प्रवाशांमध्ये झालेल्या तुफान राड्याचा व्हिडीओ व्हायरल
आता स्वस्त दरात पीठ मिळणार, सरकारची मोठी घोषणा; येथून करा खरेदी
ST कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; काय आहे घ्या जाणून
त्यानुसार पथकाला जळगाव शहरातील ऑटोनगरातील संदीप हॉटेलजवळ संशयित आरोपी राजू जगदेव बोबडे (वय-४२) रा. विटनेर ता.जि. जळगाव हा दिसला. त्यांच्या यापुर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने पोलीसांनी त्याला जागेवरच पकडले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्याने प्रमोद वसंत पाटील (वय-४६) रा. विरावली ता. यावल आणि गंगा नारायण जाधव (वय-४२) रा. अयोध्या नगर जळगाव या इतर दोन साथीदारांची नावे सांगितली.
कामानिमित्त बाहेर गावी राहणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्या नावावर कीती पॉपर्टी आहे याची चौकशी करून बनावट व डमी मालक व मालकीन उभे करून त्याच मालमत्ता धारकाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करून कमी किंमतीत विक्री करत असल्याची कबुली दिली. याच पध्दतीने अयोध्या नगरातील अनिता राजेंद्र नेहते यांचे २ कोटी रूपये किंमतीचे तीन प्लॉट विक्री करण्याच्या तयारीत होतो असेही सांगितले.

