देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी भारतीय जीवन बीमा निगम म्हणजेच LIC मध्ये मोठी भरती निघाली आहे. तब्बल 9394 पदांवर भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. उम्मीदवार 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज कसा करावा, अखेरची तारीख आदी माहिती देण्यात आली आहे.
या पदांसाठी होणार भरती?
1) नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ) 1216
2) नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) 1033
3) सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) 561
4) ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) 1049
5) साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ) 1408
6) साउथर्न झोनल ऑफिस (SZ) 1516
7) वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ) 1942
8) ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ) 669
पात्रता काय असावी?
अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असले पाहिजेत किंवा त्यांच्याकडे इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबईची फेलोशिप असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा :
रेल कोच फॅक्टरीत 10वी आणि ITI पाससाठी नोकरीची संधी.. आताच अर्ज करा
10वी, 12वी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! सीमा सुरक्षा दलात निघाली भरती
निवड प्रक्रिया
या पदांवर उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्राथमिक परीक्षा १२ मार्च २०२३ रोजी होणार आहे. तर मुख्य परीक्षा ८ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे. पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र ४ मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे.
वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : 750/- रुपये [SC/ST – 100/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 35,650/- रुपये ते 56,000/- रुपये.
जाहिरात पाहण्यासाठी : PDF