महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम २०१२ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक २३.०६.२०२२ च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.६ धुळे यांचे आस्थापनेवर सन २०२१ मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी ५९ पदे भरण्यासाठी सशस्त्र पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल.
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची प्रथम १०० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही राज्य राखीव पोलीस दलातील सर्व गटांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
अशी होईल निवड?
शारीरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवाराचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीहील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. शारीरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि. १०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.
हे पण वाचा :
कृषि विज्ञान केंद्रात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी…पगार 67000
वेस्टर्न कोलीफिल्ड लि.नागपूर येथे 900 जागांसाठी बंपर भरती, ITI पाससाठी सुवर्णसंधी..
महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळात 8वी,10वी पाससाठी खुशखबर, असा करा अर्ज??
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा