नवी दिल्ली : दिवाळी संपल्यानंतरही पिवळ्या धातूच्या दरात घसरण होताना दिसत आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. गेल्या दिवशी सोन्याचे भाव विक्रमी घसरले होते आणि सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले होते. आता पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.
एमसीएक्सवरही सोन्याचा दर घसरला
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोन्याचा वायदा दर 89 रुपयांनी घसरून 50642 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी चांदीचा भाव 63 रुपयांनी घसरून 58215 रुपये प्रतिकिलो झाला. सत्राच्या सुरुवातीला सोने 50737 रुपये आणि चांदी 58278 रुपयांवर बंद झाली.
हे पण वाचा..
क्या बात है! पात्रता फक्त 10वी पास.. कॉन्स्टेबलच्या 24,369 जागांसाठी बंपर भरती, लगेचच करा अर्ज
खडसेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला धक्का ; अनेक पदाधिकऱ्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश
शिंदे सरकारमधील मंत्र्याने जिल्हाधिकाऱ्यांना विचारला भलताच प्रश्न.. VIDEO क्लीप व्हायरल
सराफा बाजारातील दर खाली आले
शुक्रवारी सकाळी इंडिया बुलियन असोसिएशनने (https://ibjarates.com) जारी केलेल्या किमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 125 रुपयांनी घसरला आणि तो 50654 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. त्याच वेळी 999 टच चांदीचा भाव 57800 रुपये प्रति किलोवर पोहोचला. शुक्रवारी 23 कॅरेट सोन्याचा दर 50451 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट 46399 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटचा दर 37991 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.