नवी दिल्ली : ऑक्टोबर महिना जवळपास सरणार आहे. या दोन्ही महिन्यांत देशभरात एकापाठोपाठ एक अनेक सण साजरे झाले. त्यामुळे दोन्ही महिन्यात अनेक सुट्ट्या आल्या. पण नोव्हेंबरमध्ये फक्त 10 दिवस आहेत ज्यात सार्वजनिक आणि खाजगी बँकांना सुट्टी असेल. दर महिन्याप्रमाणे या वेळी नोव्हेंबरमध्ये शनिवार आणि रविवार असे सहा दिवसांचा वीकेंड असेल.
नोव्हेंबरमध्ये एकूण 10 सुट्या असतील
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बँका बंद राहतील. या दरम्यान, विशिष्ट क्षेत्रानुसार काही सुट्ट्या असतील. प्रादेशिक सुट्ट्या संबंधित राज्य सरकार ठरवतात. नोव्हेंबर 2022 मध्ये एकूण 10 सुट्या असतील. पहिली सुट्टी 1 नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सव/कुट म्हणून असेल.
सुट्ट्या राज्यानुसार बदलतात
यानंतर 8 नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी गुरुनानक जयंतीची सुट्टी आहे. काही राज्ये वगळता देशभरातील बँकांना सुट्टी असेल. बँक ग्राहकांना बँकिंग व्यवसायात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी एटीएम, कॅश डिपॉझिट, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे सर्व कामे सुरू राहतील. सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात.
आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रविवारी बँका बंद राहतील. तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देखील बँकेला सुट्टी असेल. नोव्हेंबरमध्ये चार रविवार, दोन शनिवार व्यतिरिक्त 1, 8, 11 आणि 23 नोव्हेंबरला सुट्टी असेल. या महिन्यात येणाऱ्या सुट्ट्या जाणून घेऊया…
नोव्हेंबरमधील बँक सुट्ट्यांची यादी
१. १ नोव्हेंबर २०२२—-मंगळवार——कन्नड राज्योत्सव——कर्नाटक आणि मणिपूर
2. 6 नोव्हेंबर 2022——रविवार——साप्ताहिक सुट्टी—— देशभरात
3. 8 नोव्हेंबर 2022——मंगळवार——गुरू नानक जयंती/कार्तिक पौर्णिमा——बहुतांश राज्यांमध्ये सुट्टी
4. 11 नोव्हेंबर 2022 —-शुक्रवार——कनकदार जयंती——कर्नाटक आणि मेघालय
5. 12 नोव्हेंबर 2022——शनिवार——साप्ताहिक सुट्टी——देशव्यापी
6. 13 नोव्हेंबर 2022——रविवार——साप्ताहिक सुट्टी——देशव्यापी
7. 20 नोव्हेंबर 2022 —-रविवार———साप्ताहिक सुट्टी——देशव्यापी
8. 23 नोव्हेंबर 2022 —-बुधवार——सेंग कुट सानेम——मेघालयात
9. 26 नोव्हेंबर 2022——शनिवार——साप्ताहिक सुट्टी——देशव्यापी
10. 27 नोव्हेंबर 2022—-रविवार——-साप्ताहिक सुट्टी—— देशभरात