जळगाव : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर तसेच रावेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादीचे सोशल मीडिया माजी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस वाय डी पाटील , निंभोरा उपसरपंच प्रशांत पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडिया ब्लॉगर शुभम मुर्हेकर धामोडी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, हा एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हे पण वाचा..
शिंदे सरकारमधील मंत्र्याने जिल्हाधिकाऱ्यांना विचारला भलताच प्रश्न.. VIDEO क्लीप व्हायरल
घरी एकटी असताना प्रेयसीनं प्रियकराला बोलावलं; पण तितक्यात तिचा काका, मग…
आजचे राशिभविष्य : खर्चाकडे लक्ष द्याल, अवास्तव वाद टाळा, वाचा तुमची राशी काय म्हणते ..
“त्यांना धक्के तर कायमच चालले आहेत, त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. लोण्याचे धक्के, दुधाचे धक्के, तुपाचे धक्के आणि आता हे माणसांचे धक्के,” अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला आहे.