बीड : शिंदे गटाचे सदस्य तथा राज्याचे मंत्री कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे अतिृष्टीची पाहणी दौरा करत आहेत. मात्र बीड येथे पाहणी दौऱ्यादरम्यानसत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भलताच प्रश्न विचारला. याची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामुळे अब्दुल सत्तारांवर टीकेची झोड उठली आहे.
व्हिडिओमध्ये सत्तार बीडचे जिल्हाधिकारी यांना विचारत आहेत की तुम्ही दारू पितात का? अब्दुल सत्तार यांचा प्रश्न ऐकून जिल्हाधिकारी देखील गोंधळले. काय उत्तर द्यावे हेच त्यांना कळेना. पाहणी दौऱ्यादरम्यान एका ठिकाणी चहा-पानासाठी थांबले असताना अब्दुल सत्तार यांनी हा प्रश्न विचारल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?
गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब
किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब
एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो ???? pic.twitter.com/UDZsfypmAO— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022
हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा दुःखाचा विसर पडतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर विरोधकांनी देखील सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओनंतर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी व्हिडिओ ट्विट करून अतिृष्टीची पाहणी दौरा की दारूभट्टी पाहणी दौरा?’ यासोबतच एक कविताही शेअर केली आणि लिहिले की, ‘दु:खाचा काळ असो किंवा आनंदाचा काळ, दारू एकत्र बांधते. शेतकरी मेला की आत्महत्या, दारूबंदी. एक सुचना आहे साहेब, थोडं थोडं प्या, खूप महागडी दारू, हळूहळू प्या.