एरंडोल : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसतेय. अशातच एरंडोल तालुक्यातील खुनाची एक धक्कदायक घटना समोर आलीय. क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केला. ही घटना एरंडोल उत्राण (गु.ह.) येथे घडली असून या घटनेने गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी सत्यवान महाजन यांना त्यांचाच मोठा भाऊ भगवान धोंडू महाजन याने मारल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आले आहे.
तालुक्यातील भातखंडेच्याजवळ गिरणा नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. हा व्यक्ती तालुक्यातील उत्राण येथील सत्यवान धोंडू महाजन यांचा असल्याची ओळख पटली. त्यांचा मृत्यू गिरणेच्या पाण्यात वाहून गेल्याने झाला नव्हता, तर त्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली. या प्रकरणी सत्यवान महाजन यांना त्यांचाच मोठा भाऊ भगवान धोंडू महाजन याने संपविल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
हे पण वाचा :
१४ वर्षीय मुलगीवर ४० वर्षीय व्यक्तीचा अत्याचार ; रावेर तालुका हादरला
एकनाथ खडसेंची मानसिकता ठिकाणावर आहे काय? ‘त्या’ आरोपावरून आ.चंद्रकांत पाटलांचा पलटवार
महिलांसाठी उत्तम संधी.. एक अर्ज आणि मोफत शिलाई मशीन मिळवा, असा करा अर्ज?
धक्कादायक : हॉस्टेलमधील 60 तरुणींचे अंघोळ करतानाचे Video केला व्हायरल ; 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न
दरम्यान भगवान महाजन याने चौकशीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानुसार भगवान महाजन (वय ६२) आणि सत्यवान महाजन (वय ५५) हे दोन्ही भाऊ एरंडोल तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथील रहिवासी होते. दोन्ही एकाच घरात राहत असून त्याच्यात अनेकदा वाद व्हायचे. दि. १२ सप्टेंबर रोजी सत्यवान महाजन यानी घरातील मोरीत लघुशंका केल्यावरून वाद झाला. यातून संतापलेल्या भगवान याने डोक्यात मुसळी मारल्याने सत्यवान महाजन यांचा जागीच मृत्यू झाल्याने भगवानने मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला.
यानंतर रात्री उशीरा त्याने पोत्यातून मृतदेह नेवून तो गिरणा नदीच्या पात्रात फेकून दिला. दरम्यान गिरणेत मृतदेह आढळून आल्यानंतर भगवान हा घरातून गायब झाला. त्याने शुक्रवारी उत्राणमधील एकाला फोन करून बोलावून याची माहिती दिली. त्या व्यक्तीने भगवान महाजन याला पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याची सांगितले. मात्र त्याने तेथून पलायन केले. शेवटी उत्राणच्या पोलीस पाटलांनी पोलिसांच्या मदतीने एरंडोल स्थानकावरून भगवान महाजन याला अटक केले. याप्रकरणी कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.