अहमदनगर : सध्या गाजत असलेला सुप्रसिद्ध मराठी चित्रपट “चंद्रमुखी”, या चित्रपटातील अतिशय गाजलेली लावणी, जी गायिली आहे, सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल, आणि या लावणीतील नृत्यांगना आहे. सर्वांची आवडती अशी, अमृता खानविलकर अल्पावधित रसिकांच्या पसंतीला हे गाणं उतरलं आहे. हे गाणं शाळेतील एका विद्यार्थ्यांन गायलं असून संपूर्ण महाराष्ट्राला या विद्यार्थ्यांच्या आवाजानं वेडं लावलं आहे या गाण्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हीडिओत हा विद्यार्थी प्रसिद्ध अशी ‘चंद्रा’ लावणी आपल्या मधूर आवाजात म्हणताना दिसतोय. हा व्हीडिओ कृष्णा राठोड यांनी फेसबूकवर शेअर केलाय. जयेश खरे असे या विद्यार्थ्यांचे नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील करजगावच्या विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकतोय. व्हायरल झालेल्या या व्हीडीओमधून कौशल्य, आवाजात गोडवा आणि अप्रतिम चढउतारचं कौशल्य दिसून येतंय.
अमृता खानविलकरचीही दाद
हा व्हीडिओ नेटकऱ्यांनी डोक्यावर धरुन उचललाय. इतकंच नाही, तर थेट हा व्हीडिओ पाहून चंद्रा या लावणीवर थिरकलेल्या अमृता खानविकरलाही हा व्हीडिओ आवडलाय. तिने या फेसबूकवर पोस्टवर “Kaaaamaaaallll” अशा शब्दात प्रतिक्रिया देत कौतुक केलंय.