जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटातील आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने नऊ कोटी रुपये कामे न करता बीले काढल्याच आरोप केलेला होता. आता या आरोपावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्त्युत्तर दिल आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणले चंद्रकांत पाटील? माझा भाचा उज्वल बोरसे याने नवे बोरखेडा -उंबरा ते जोंधणखेडा आणि मच्छिंद्रनाथ मंदिर असा रस्ता अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तयार केलेला असून हा रस्ता तीन कोटी चाळीस लक्ष रुपयांना मंजूर होता, मग नऊ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला कसा? असा पलटवार करत आ. चंद्रकांत पाटील यांनी एकनाथराव खडसे यांची मानसिकता ठिकाणावर आहे काय असा प्रति प्रश्न केला. सदर कामाची संयुक्त चौकशी समितीने सखोल चौकशी केलेली असून त्या संदर्भात अहवाल देखील सादर केलेला आहे आणि सदर रस्ता सुस्थितीत, रहदारीस योग्य असल्याचे म्हटलेले असताना खडसे यांचा आरोप केवळ माझ्या भाच्याची बदनामी करण्याचा प्रकार आहे.सदर खोट्या आरोपाला उत्तर देणे संयुक्तिक वाटत नसले तरी वस्तूस्थिती जनतेसमोर येण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा : महिलांसाठी उत्तम संधी.. एक अर्ज आणि मोफत शिलाई मशीन मिळवा, असा करा अर्ज?
धक्कादायक : हॉस्टेलमधील 60 तरुणींचे अंघोळ करतानाचे Video केला व्हायरल ; 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न
पुढील 7 दिवस ‘या’ राशींसाठी उत्तम, धनलाभसह रखडलेली कामे मार्गी लागतील
अरे बापरे.. आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीला 50 वर्षीय व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं
खडसे यांनी आपल्यावर पाच कोटी रुपयांचा निधी परत पाठवण्याचा आरोप केला आहे. या संदर्भात आमदार पाटील यांनी सांगितले की, हो मी निधी परत पाठवला आहे, परंतु त्यापैकी अडीच कोटी रुपयांचा निधी केवळ खडसे यांच्या शैक्षणिक संस्था व मंगल कार्यालयाच्या उपयोगासाठी आणण्यात आलेला होता. त्यामध्ये 690 गट नंबर मध्ये पेवर ब्लॉक बसवणे 15 लक्ष रुपये, मुक्ताईनगर येथील सायन्स कॉलेज नजीक 1000 मीटर रस्त्याचे ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे 25 लक्ष रुपये, मुक्ताईनगर येथे विज्ञान कॉलेज नजीक व्यायाम शाळा बांधकाम करणे 35 लक्ष रुपये, मुक्ताईनगर येथे गट नंबर 699 मध्ये मल्टीपर्पज हॉल बांधकाम करणे 50 लक्ष रुपये, मुक्ताईनगर येथे मंगल कार्यालय नजीक पेवर ब्लॉक बसवणे दहा लक्ष रुपये, पुनर्वसन टप्पा क्रमांक तीन मध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे 20 लक्ष रुपये आणि गट नंबर 120 च्या एक मध्ये विद्यालया नजीक मल्टीपर्पज हॉल बांधणे पन्नास लक्ष रुपये, हे जवळपास अडीच कोटी रुपयांची कामे खडसे यांच्या वैयक्तिक संस्थेच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार होते. यामध्ये गोदावरी मंगल कार्यालया चा देखील उल्लेख करत मंगल कार्यालयाचे बांधकाम खासदार व आमदार निधीतून करण्यात आला असून या मंगल कार्यालयातून वर्षभर येणारे भाडे तत्वावरील उत्पन्न हे स्वतःच्या खिशात खडसे घालत असून हा खरा भ्रष्टाचार आहे असा आरोप त्यांनी याप्रसंगी केला. प्रत्यक्ष सामान्य कुटुंबातील व्यक्ती आमदार झाला म्हणून त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेला असल्याचा आरोपही त्यांनी केला.