चंदीगड : पंजाबच्या चंदीगड विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीने 60 मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवल्याने मोठा गोंधळ उडाला. हे व्हिडिओ तरुणांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. ही बाब समोर येताच काही तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी चंदीगड विद्यापीठाला घेराव घातला आणि ‘वी फॉर जस्टिस’ असा नारा दिला. व्हिडिओ बनवणाऱ्या मुलीवर हल्ला होऊ नये म्हणून तिला हॉस्टेलच्या एका खोलीत बंद करून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी व्यवस्थापन त्यांच्यावर दबाव आणत असल्याचे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
हे पण वाचा :
पुढील 7 दिवस ‘या’ राशींसाठी उत्तम, धनलाभसह रखडलेली कामे मार्गी लागतील
अरे बापरे.. आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीला 50 वर्षीय व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं
मामाच्या मुलीवर जडलं प्रेम, लग्नाला मामाचा नकार, नंतर रागाच्या भरात भाच्याने जे केलं ते धक्कादायक…
मुलांच्या नावावर FD करण्याचा विचार करताय? जाणून घ्या व्याजाच्या उत्पन्नावर कसा कर लागेल?
हा गोंधळ एवढा वाढला की घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि सुरक्षा रक्षकाने मुख्य गेट बंद केलं. संतप्त विद्यार्थ्यांनी पीसीआर वाहनांवर हल्ला करण्यास सुरुवात केला, यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. प्रकरण वाढत असल्याने पोलीस प्रशासनानेही काही बोलत टाळलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर मुलींचा व्हिडिओ व्हायरल करणारा तरुण हा शिमला येथील रहिवासी आहे. हॉस्टेलमधील एक मुलगी त्याला मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढून पाठवायची.