मुक्ताईनगर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, 20 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अभिष्टचिंतनपर कार्यक्रमासाठी ते मुक्ताईनगरमध्ये येणार आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांचा बुधवार, 14 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. यंदा वाढदिवसाला अतिशय जंगी पध्दतीत साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवार, 14 रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा नियोजीत कार्यक्रम असल्याने हा कार्यक्रम 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे.
क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणार कार्यक्रम
शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांची उपस्थिती असेल. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रीत करण्यात येणार आहे. या माध्यमातून आमदार चंद्रकांत पाटील हे मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहेत.
हे पण वाचा..
घरी बसून काढता येणार उत्पन्नाचा दाखल ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनांमध्ये होईल मोठी कमाई, वार्षिक 7.6 टक्के व्याज मिळेल
Amazon च्या आगामी सेलच्या तारखा जाहीर ; स्मार्टफोनपासून ते स्मार्ट टीव्हीवर मिळेल बंपर सूट…
भरधाव कंटेनरने कारला तब्बल २ किलोमीटर फरफटत नेलं ; थरारक अपघाताच सीसीटीव्हीत कैद
प्रथमच मुख्यमंत्री मुक्ताईनगरात
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा मुक्ताईनगर शहरांमध्ये येत आहे. मुख्यमंत्री दौर्यात काय घोषणा करतात तसेच विधान परीषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परीषदेचे आमदार झाल्यानंतर विधान परीषदेत केलेल्या भाषणाच्या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे काय बोलतात ? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.