जळगाव : नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरणा नदीला पूर आला आहे. नदीकाठच्याना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र अशातच जळगाव शहरानजीक गिरणा नदीवर असलेल्या कांताई बंधाऱ्यावरील नागाई जोगाई मंदिराजवळ आज रविवारी शिवाजी नगर परिसरातील मुलांनी ट्रीप काढली होती. यावेळी पोहोण्यासाठी गेलेले चार मुले पाण्यात वाहून जात होती. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले तर एकाचा शोध सुरु आहे. दरम्यान, वाचविण्यात यश आलेल्या तिघं मुलांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजतेय.
काय आहे घटना?
जळगाव शहराजवळ गिरणा नदीवर असलेल्या कांताई बंधाऱ्यावर शिवाजी नगर परिसरातील मिथिला अपार्टमेंटमधील मुलांनी कांताई बंधाऱ्यावर रविवारची ट्रीप काढली होती. यावेळी एकाचा पाय घसरल्यामुळे त्याचा पाण्यात तोल गेला. त्यावेळी त्याला वाचवण्यात चार मुलं पाण्यात वाहून जात होती. त्यातील तीन मुलांना वाचवण्यात यश आले. समिक्षा विपीन शिरडुकर (वय १७), योगिता दामू पाटील (वय २०) आणि सागर दामू पाटील (वय २४) असे वाचवण्यात आलेल्याचे नाव असून तर नयन योगेश निंबाळकर (वय १४) हा बेपत्ता झाला असून त्याचा शोध अद्याप सुरु आहे
हे पण वाचा..
घरी बसून काढता येणार उत्पन्नाचा दाखल ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनांमध्ये होईल मोठी कमाई, वार्षिक 7.6 टक्के व्याज मिळेल
Amazon च्या आगामी सेलच्या तारखा जाहीर ; स्मार्टफोनपासून ते स्मार्ट टीव्हीवर मिळेल बंपर सूट…
भरधाव कंटेनरने कारला तब्बल २ किलोमीटर फरफटत नेलं ; थरारक अपघाताच सीसीटीव्हीत कैद
घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. वाचविण्यात यश आलेल्या तिघं मुलांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.