पुणे : पुणे अहमदनगर महामार्गावर भयंकर अपघात घडला. भरधाव कंटेनरने कारला तब्बल २ किलोमीटर फरफटत नेली. धक्कादायक म्हणजे ज्या कारला कंटेनरने फरफटत नेलं, त्या कारमध्ये चार प्रवासी होते. या कारमधील प्रवाशांनी डोळ्यासमोर मृत्यू अनुभवला. पण थोडक्यात हे सर्व प्रवासी बचावले.
हायवेच्या रस्त्यालगत लागलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही थरारक घटना कैद झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये भरधाव कंटेरनसमोर कार अक्षरशः आडव्या रेषेत आल्याचं दिसून आलंय. हा अपघात इतका भीषण होता की, कारला कंटेरन जेव्हा फरफटत नेत होता, तेव्हा रस्त्यावर ठिणग्या उडत होत्या. यावरुन कंटेनरचा वेग किती प्रचंड असेल, याची कल्पना करता येऊ शकेल.
पुणे-नगर महामार्गावर भरधाव कंटेनरने तब्बल २ किलोमीटर फरफटत नेली कार pic.twitter.com/ozrOqFiZ38
— News18Lokmat (@News18lokmat) September 11, 2022
पुणे-नगर हायवेवरील शिक्रापूर इथं हा अपघात घडला. या भीषण अपघातावेळी कारमध्ये एकूण चार प्रवासी होते. या भीषण अपघातातून दैव बलवत्तर म्हणून चारही प्रवासी अगदी थोडक्यात बचावले आहेत. कारमधील एकालाही कोणतीही दुखापत झाली. मात्र अपघातामुळे सगळ्यांची मोठी घाबरगुंडी उडाली होती. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय कारमधील चारही प्रवाशांना आला.