अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय असून येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आलीय. आधी पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव पतीने केला होता. मात्र, तपासात हा बनाव उघडा पडला. देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी असे आरोपीचे नाव असून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथील माहेर असलेल्या योगिता चौधरी हीचा विवाह अमळनेर येथील देविदास उर्फ सूर्यकांत चौधरी याच्याशी झाला होता. देविदास उर्फ सूर्यकांत याला दारूचे व्यसन असून तो मजुरी करतो मुलबाळ नसल्याने तो पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला मारहाण करीत होता. दोन तीन दिवसांपूर्वी योगिता चलथान सुरत येथे मामाच्या घरी गेली असताना पतीने नातेवाईकांकडे तिची बदनामी सुरू केली होती म्हणून योगिता गैरसमज दूर करण्याकरिता पुन्हा पतीकडे परत आली होती.
आधी आत्महत्येचा बनाव..
यादरम्यान, पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. आधी बचत गट वाले कर्जाचे पैसे मागणीसाठी तगादा लावत होते, त्यामुळे ८ रोजी योगीताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनव पती देविदासने केला. अगदी पोलिसात खबर देतांना त्याने आत्महत्यानंतर ती खाली पडून आली असेही नमूद केले.
परंतू मयत विवाहितेचे भाऊ दिनेश आत्माराम चौधरी व इतरांनी प्रत्यक्ष पाहिले असता योगीताच्या गळ्यावर सर्व बाजूने दोरी आवळल्याचे व्रण होते. तसेच गळ्यावर ओरखडल्याच्या खुणा होत्या आणि तिच्या नाकातून देखील रक्त बाहेर आलेले होते. पतीने आपला बचाव करतांना आत्महत्या केल्यानंतर पत्नीने बचाव करत असतांना स्वत:ची नखे लागली असावीत असे सांगितले. परंतू याची खात्री करण्यासाठी नखे तपासली असता ती वाढलेली नव्हती व चालूच कापलेली आढळून आली.
हे पण वाचा :
नीट परीक्षेत गुण कमी पडल्यामुळे तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
गणपती विसर्जनपूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी, मिळेल तुम्हाला इच्छित जीवनसाथी…
पोहण्याचा मोह जीवावर बेतला ; दोन शाळकरी मुलांचा डोहात बुडून मृत्यू, शिरसोलीजवळील घटना
..म्हणून महिलेने ब्युटी पार्लरवाल्याला चप्पलने धुतलं ; पहा ‘हा’ व्हिडीओ
तसेच योगिता वरून खाली पडून आली असे सांगितले जात होते मात्र वरून पडल्याने लागलेल्या काहीच जखमा अथवा चिन्हे दिसली नाहीत. त्यामुळे योगीताचा खून झाल्याची खात्री भाऊ दिनेशला झाल्याने त्याने रात्री उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्ल्यायानुसार आज पहाटे पती सूर्यकांत विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.