सोलापूर : डाय करूनही केस पांढरेच असल्याने एका महिलेने ब्युटी पार्लरवाल्याला चप्पलने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडला. महिलेने पार्लरमधील काचही फोडली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, महिलेविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर बाजार पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे.
सात रस्ता येथे डायमंड नावाचे हेअर सलुन व ब्युटी पार्लर आहे. या ठिकाणी १९ ऑगस्ट रोजी वर्षा काळे या महिलेने येथे हेअर कट आणि हेअर डाय केले होते. डोक्यावर असलेली सर्व केस काळे केले होते. यासाठी ब्युटी पार्लरवाल्याने ५ हजार रुपये बिल आकारले होते. काही दिवसानंतर महिलेने आरशात पाहिले असता काळ्या केसांमध्ये पांढरे केस निर्दशनास आले.
सोलापूर : डाय करूनही केस पांढरेच! महिलेने ब्युटी पार्लरवाल्याला चप्पलने धुतलं pic.twitter.com/oT7weMhjUo
— Maharashtra Times (@mataonline) September 7, 2022
केसांना डाय केलं असूनही केस पांढरे असल्यामुळे या महिलेने ब्युटी पार्लरवाल्याला शिवीगाळ करत चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली. स्वतःला वाचवण्यासाठी ब्युटी पार्लर चालक दुकानाबाहेर आला असता बाहेरील बाजूस वर्षा काळे या महिलेने चप्पल फेकून मारली. त्यानंतर तिथल्या इतर कामगारांना देखील चप्पलने मारहाण केली.