मुंबई : मोठ्या खंडानंतर राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार आज बुधवारपासून येत्या आठ दिवस म्हणजे १४ सप्टेंबपर्यंत संपूर्ण राज्यभरात विजा आणि गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, येत्या तीन दिवसांत गणपती विसर्जनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (8 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. लांबलेल्या पावसामुळं खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, अशातच पावसाचा इशारा देण्यात आला असून पिकांनी जीवदान मिळणार.
हे पण वाचा :
आईवडिलांनीच रचला पोटच्या मुलीच्या हत्येचा कट ; कारणही आहे काळजाचा थरकाप उडवणारं..
‘या’ 2 राशींवर पडणार शनीची कृपा, करिअरमध्ये मिळेल संधी अन् पैसा..
जिल्ह्यातील ‘या’१२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर, जाणून घ्या संपूर्ण तारखा
निर्णय नाहीच ! राज्यातील सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी ‘या’ तारखेला होणार
सतर्क राहण्याचे आवाहन
दरम्यान, गणेश विसर्जनाच्या (अनंत चतुर्दशी) दिवशी राज्याच्या सर्वच भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे, असा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. या कालावधीत सतर्क राहावे, असेही हवामान विभागाकडून कळविण्यात आले आहे.