मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षांवर आज घटनापीठासमोर सुनावणी पार पडली.न्यायमूर्ती धनंजय चंद्रगुड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काय निर्णय होणार याकडे शिंदे आणि उद्धव ठाकरे गटासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. मात्र आजही निर्णय झाला नाही. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी तब्बल २० दिवस पुढे गेल्याने निर्णयासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर घटनापीठाने 27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष आणखी लांबला आहे.
यावेळी शिंदे गटाचे अॅड. नीरज कौल यांनी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी घटनापीठाकडे केली, तसेच आगामी निवडणूक डोळ्यासमोर असल्याने चिन्हांबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली मात्र 27 सप्टेंबर पर्यंत धनुष्यबाणा बाबत कोणताही निर्णय घेऊ नका असे आदेश घटनापीठाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाची विनंती कोर्टाने नाकारल्याचे स्पष्ट झालं आहे.