मेरठ : आईवडिलांनीच आपल्या पोटच्या 11 वर्षांच्या मुली हत्येचा कट रचलाय. मुलीची हत्या करण्याचं कारणही काळजाचा थरकाप उडवणारं आहे. मुलीला वाईट संगत लागली होती, सांगूनही ती ऐकत नव्हती, मुलांसोबत ती मोबाईलवर बोलत बसायची, याच गोष्टीचा रागातून तिच्या आईवडिलांनी आपल्याच मुलीला जिवंतपणी नाल्यात फेकून देत तिचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना मेरठच्या गंगानगर भागातील गंगानगरमध्ये उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पालकांसह तीन आरोपींना अटक केली आहे.
काय आहे घटना?
बबलू नावाची व्यक्ती एका भाड्याच्या घरात आपल्या तीन मुलांसोबत पत्नीसह राहत होती. बबलू एका कंपनीत कामाला होता. बबलूने 1 सप्टेंबर रोजी गंगानगर पोलिस ठाण्यात त्यांची 11 वर्षीय मुलगी चंचल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलीस शोध घेऊ लागले. पोलिसांनी बबलू आणि त्याच्या पत्नीचे जबाब नोंदवल्यानंतर त्यांचा संशय अधिकच बळावला. दोघांच्याही जबाबात तफावत आढळून येत होती. त्यामुळे पोलिसांना हे प्रकरण अधिक गंभीर असल्याचं दिसून आलं. अखेर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर बबलूने खरं काय ते पोलिसांसमोर सांगितलं.
हे पण वाचा :
‘या’ 2 राशींवर पडणार शनीची कृपा, करिअरमध्ये मिळेल संधी अन् पैसा..
जिल्ह्यातील ‘या’१२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर, जाणून घ्या संपूर्ण तारखा
अन् एका व्यक्तीला डॉक्टरांसमोरच आला हृदय विकाराचा झटका, मग… पहा व्हिडिओमध्ये पुढे काय झालं
घाबरलेल्या बबलूने आपणच मुलीच्या हत्येचा कट रचल्याचं कबूल केलं. मुलीला वाईट संगत लागली होती, सांगूनही ती ऐकत नव्हती, मुलांसोबत ती मोबाईलवर बोलत बसायची, म्हणून तिची हत्या केली, असं बबलूने पोलिसांना सांगितलं. एक सप्टेंबर रोजी एका नाल्यात ढकलून देत 11 वर्षांच्या निष्पाप मुलीचा तिच्या आईवडिलांनीच खून केला, हे अखेर पोलिसांच्या तपासातून उघडकीस आलं. याप्रकरणी अधिक तपास केला जातोय. अजूनही पोलिसांकडून मुलीचा मृतदेह शोधण्याचं काम केलं जातंय.