बुलढाणा : बुलडाण्यात हनी ट्रॅपचा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. येथे एका माजी सरपंचांना महिलेने कॉल करुन निर्जन स्थळी बोलावून घेतलं आणि तिथे ती त्यांच्यासमोर निर्वस्त्र झाली. त्यानंतर तिथे लपलेल्या पाच जणांनी माजी सरपंचाला मारहाण करत त्यांना लुटलं. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी काही तासातच आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या माजी सरपंचाला एका महिलेने फोन केला. यावेळी ती महिला म्हणाली, मी तुमच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करु इच्छिते. त्यानंतर माजी सरपंचांनी तात्काळ सांगितलेल्या शहरातील निर्जन अशा डी एड कॉलेज परिसर गाठला. त्यानंतर महिलेने एका टीन शेडमध्ये त्यांना बोलावलं.
हे पण वाचा :
सोन्या-चांदीच्या भावाने पकडला पुन्हा वेग, पहा आज किती रुपयाने महागले?
युवक रेल्वे ट्रॅकजवळ बनवत होता ‘इंस्टाग्राम रील’, तेवढ्यात मागून आली ट्रेन अन्.. पहा हा थरार Video
तू गोधडीत पण नव्हता, तेव्हापासून.. ; मंत्री गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचतोय, पण..; सामनातून भाजपवर पुन्हा हल्लाबोल
महिला निर्वस्त्र झाली, पण पुढे काही होणार त्यापूर्वीच तिथे लपून बसलेल्या पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी केली. तसेच, त्यांच्याजवळ असलेले साडे पाच हजार रुपयेही काढून घेतले आणि पळून गेले. त्यानंतर माजी सरपंचाने थेट पोलीस ठाणे गाठवे आणि या घटनेची माहिती बुलडाणा पोलिसांत दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींना महिलेसह अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.