जळगाव : जळगावातील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या अनोख्या शैलीत भाषणातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ” 32 वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत”, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला.
यावल तालुक्यातील न्हावी येथे भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, लोकनियुक्त सरपंच भारती नितीन चौधरी, उपसरपंच उमेश बेंडाळे, माझी पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी यांच्या पाठपुरावाने गावासाठी ही पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काही लोक म्हणतात की तेरा क्या होगा कालिया? मात्र आहे आमचा गब्बर आहे”, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलं. “मी गुवाहाटी गेलो. तेव्हा पत्नी-मुलांचे फोन आले की परत या. पण आता परत येत नाही असं मी त्यांना ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अली बाबा के चालीस चोर थे तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत! या शब्दात इतिहास लिहिला जाईल”, असंही पाटील म्हणालेत.
हे पण वाचा :
कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचतोय, पण..; सामनातून भाजपवर पुन्हा हल्लाबोल
अल्पवयीन मुलांसाठी SBI देतेय खाते उघडण्याची सुविधा, जाणून घ्या कोणते फायदे मिळणार?
..म्हणून भाजपचे खा.नवनीत राणा उद्या जळगाव शहरात येणार
फक्त 122 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीसह 26 लाख रुपयांचा निधी मिळवा! जाणून घ्या ‘या’ पॉलिसीबद्दल?
गेल्या 35 वर्षात आम्ही काय केले ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ते 32 वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतं. तू गोधडीत पण नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत”, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला.