काझीपेठ : लंगणातील हनुमाकोंडा जिल्ह्यातील काझीपेठ येथे रेल्वे ट्रॅकजवळ इंस्टाग्राम रील बनवताना एक किशोर गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी घडली. सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षय राज (१७) असे या तरुणाचे नाव आहे. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
जखमी अक्षय राज याला रुग्णवाहिका सेवेला फोन करून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अक्षय राज हा वडेपल्लीच्या कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Warning Visuals ⚠️
Train hits youth while making ‘reel’ at railway track near Kazipet, #Telangana
The railway police are advising the youth not to take videos on the railway tracks as they might lose their precious lives in the accidents.@GMSRailway@RailMinIndia pic.twitter.com/JHnKZ9Xma5
— The Seithikathir (@IndiaNewsDigest) September 4, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय त्याच्या मित्रासोबत रेल्वे ट्रॅकजवळ ‘रीळ’ बनवण्यासाठी आला होता. मित्राने व्हिडिओ बनवताच अक्षय रेल्वे ट्रॅकजवळ उभा राहिला. तेवढ्यात मागून एक हायस्पीड ट्रेन आली.
ट्रेन अक्षयच्या जवळ येताच त्याला धडकून ओव्हरटेक केली. धक्क्याने अक्षय रेल्वे रुळाजवळ पडला. त्याला खूप दुखापती झाल्या आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. उपचार सुरू आहेत.