सुक्रिया महाडीक याच्या मध्यस्थीने सुक्रिया महाडीकचा शालक गोविंद यास पीडित मुलीला ३ लाख ६० रुपयामध्ये विक्री केली. त्याने संशयित आरोपींच्या उपस्थितीत लग्न केले. गोविंद याने लग्न करुन त्याच्या घरात वेळोवेळी अल्पवयीन पिडीताचे इच्छेविरुध्द जबरीने अत्याचार केला.
घरच्यांना खोटं सांगून आधी पळवून नेले….
धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा अठ्ठारीपाडा येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ७ मार्च २०२२ रोजी संदिप सुकलाल पावरा व संगीता संदिप पावरा यांनी पाहुणी म्हणुन घरी घेऊन जातो असे मुलीच्या घरच्या खोटं सांगुन टेंभुर्णी सोलापूर येथे पळवून नेले होते.
पोलिसात गुन्हा दाखल…
दरम्यान याबाबत पिडीत मुलीच्या नातलगांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुक्रिया महाडीक (रा.टेंभुर्णी ता.म्हाढा, जि. सोलापूर), सुक्रिया महाडीकचा शालक गोविंद (रा.आलेगाव ता. म्हाढा, जि.सोलापूर), संदिप सुकलाल पावरा, संगीता संदिप पावरा (रा.राडीकलम, धडगाव), गोविंदची आई व गोविंदची वडील (दोनही रा.आलेगाव, ता.म्हाढा, जि.सोलापूर)यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२), (एन) ३६६ (अ), ३७२, ३७३ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण २०१२ चे क ५ (एल) ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.