इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या ठाण्यातील एका अल्पवयीन मुलीवर भिवंडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी नारपोली पोलिसांनी तिघां आरोपीना ताब्यात घेतले असून आज सोमवारी न्यायालयात हजर करणार आहेत.आरोपींनी या मुलीला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला.
प्राप्त माहिती नुसार ठाणे परिसरात राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीचे वय १६ वर्षे असून २६ ऑगस्ट रोजी दुपारी भिवंडीतील काल्हेर येथील एका इमारतीमध्ये या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलीने विरोध केल्यानंतर दोन आरोपींनी तिला मारहाण केली. हा प्रकार कोणाला न सांगण्याबाबत धमकीही दिली. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर तिघांविरुद्ध सुरुवातीला चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नंतर हा गुन्हा नारपोली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. आरोपींचे वय २१, २२ आणि ३५ वर्षे असून तिघेही ठाण्यातील रहिवाशी आहेत