मुंबई – भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अखेर भारताने विजयी षटकार लागावल्यानंतर संपूर्ण देश विजयाचं सेलिब्रेशन करत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सुद्धा या विजयाचे सेलिब्रेशन केले….शरद पवारांच्या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर शेअर केला आहे.
शेवटच्या षटकातील ४ थ्या चेंडूवर षटकार…आणि जल्लोष
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात निर्णायक ठरलेल्या हार्दीक पांड्याने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार उंचावताच भारतीयांचा एकच जल्लोष सुरु झाला. देशातील अनेक महानगरांमध्ये रस्त्यावर येऊन तरुणाईचा जल्लोष सुरु असतांना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी tv समोर मॅच पाहत असतांना दोन्ही हात उंचावून… जींकलो चा जल्लोष केल्याचा पाहायला मिळत आहे, याबाबतचा व्हिडीओ शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
शरद पवारांनी आयसीसीचे अध्यक्ष पद भूषवलं आहे
देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी आयसीसीचे अध्यक्ष पद भुषवलं आहे. शरद पवारांना क्रिकेट खेळात आवड आहेच… म्हणूच या ८० वर्षाच्या तरुण म्हटल्या जाणाऱ्या शरद पवारांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सामन्याचा घरी बसून आनंद घेतला. अखेरच्या षटकापर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या या रोमहर्षक सामन्यातील शेवटच्या षटकात चौथ्या चेंडूवर हार्दीक पांड्याने षटकार ठोकताच, शरद पवारांनी हात उंचावत जल्लोष साजरा केला. व्हिडिओत शरद पवार हे आपल्या नातवांसोबत टीव्हीवर मॅच पाहताना दिसत आहेत
भारताचा अविस्मरणीय विजय….
पाकिस्तानने दिलेल्या १४८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून भारतीय संघाने ही किमया साधली. पाकिस्तानने १९.५ षटकांत सर्वबाद १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात निराशाजनक झाली मात्र अखेर जडेजा आणि पांड्याच्या संयमी खेळीने भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने विजयी षटकार लगावून भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
Thank you Indian Cricket Team for making it a Happy Sunday for India! ???? pic.twitter.com/pDWWWKcd6n
— Supriya Sule (@supriya_sule) August 28, 2022