नाशिक,(प्रतिनिधी)- नाशिक पवन नगर परिसरातील प्रताप विहार मिल्ट्री परिसरात सावता नगर येथे आपल्या संरक्षणासाठी व देशाच्या संरक्षणासाठी हे लोक बाहेर आपल्या कुटुंबांना सोडून लांब असतात त्यांच्या आनंदासाठी एक छोटीशी स्माईल म्हणून ऍक्टिव्हिटी बायज्यूस ट्युशन सेंटर कडून जोरदार ऍक्टिव्हिटीचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मुलांची चित्रकला स्पर्धा स्कॉलरशिप टेस्ट घेण्यात आली व गेम खेळून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व त्याची माहिती मुलांना देण्यात आली. कार्यक्रमा प्रसंगी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लॉक डाऊन च्या काळात अभ्यास मागे पडल्या मुळे मार्गदर्शन व अभ्यासाबद्दल आवड निर्माण करण्यात आली बायज्युस टीम चे मॅनेजर अशुतोष गायकवाड, मुकेश मूर्ती ,सागर पाटील ,अक्षय मोरे,माधुरी जाधव, मंगेश साळवे यांनी परिश्रम घेतले.