मुंबई, (प्रतिनिधी)- रिक्षा चालक असलेला प्रियकर रिक्षा चालवत होता आणि मागे प्रियसी बसलेली होती… चालू रिक्षात प्रियासीने ओढणीने त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली असून हत्ये नंतर प्रियसीने पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली आहे.रमजान शेख असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी शनिवारी पोलिसांनी जोहरा शाह या ३२ वर्षीय महिलेला अटक केली आहे.
दोघे लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते….
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून जोहरा शाह आणि रिक्षाचालक असलेला तिचा प्रियकर रमजान शेख (वय-२६) हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते. हे दोघेही पवई आणि आरेच्या दरम्यान असलेल्या फिल्टरपाडा या परिसरात राहत होते.
प्रियकर लग्नास नकार देत होता…
जोहरा आणि रमजानमध्ये मागील काही दिवसांपासून लग्नाच्या मुद्द्यावरून वाद सुरू होते. हाच वाद सोडवण्यासाठी दोघेही रिक्षातून पोलीस ठाण्याकडे निघाले होते. मात्र रिक्षात मागे बसलेल्या जोहरा शाह हिने वाटेतच रमजानचा गळा आवळून त्याला ठार केले.