नवी दिल्ली: मागील काही काळात देशात बनावट नोटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे मोदी सरकारकडून विविध पाऊले उचलली जात आहे. अशातच तुमच्याकडे २ हजाराची नोट असल्यास सावध व्हा. कारण दोन हजाराची नोट खरी आहे की खोटी ते तपासून घ्या. बोगस नोटांची आकडेवारी देत मोदी सरकारनं हे आवाहन केलं आहे.
२०१८ ते २०२० या कालावधीत बोगस नोटांचं प्रमाण वाढलं आहे. याबद्दलची आकडेवारी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिली. एनसीआरबीकडे असलेल्या आकडेवारीनुसार २०१८ ते २०२० दरम्यान जप्त करण्यात आलेल्या बोगस नोटांची संख्या वाढली आहे.
अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत बोगस नोटांबद्दल महत्त्वाची माहिती दिली. २०१६ मध्ये २ हजारांच्या केवळ २ हजार २७२ बोगस नोटा जप्त करण्यात आल्या. २०१७ मध्ये हा आकडा थेट ७४ हजार ८९८ वर पोहोचला. २०१८ मध्ये हे प्रमाण कमी झालं आणि ५४ हजार ७७६ वर आलं. २०१९ मध्ये २ हजाराच्या ९० हजार ५५६ नोटा जप्त करण्यात आल्या. २०२० मध्ये हेच प्रमाण थेट २ लाख ४४ हजार ८३४ वर गेलं.
हे पण वाचा :
बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स : तब्बल 6000 हून अधिक पदाची भरती
मोठी बातमी : 8 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं
प्रोजेक्ट्स एंड डेवलपमेंट इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती, 59,700 पगार मिळेल
सुसाईड नोट लिहून अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमासृष्टी हादरली
२०२० नंतर २ हजाराच्या किती बोगस नोटा जप्त करण्यात आल्या याची माहिती मोदी सरकारनं दिलेली नाही. बँकिंग यंत्रणेत जप्त करण्यात आलेल्या २ हजारांच्या बोगस नोटांची संख्या २०१८-१९ ते २०२०-२१ या कालावधीत कमी झाल्याचं सरकारनं संसदेत सांगितलं. २०२१-२२ मध्ये बँकिंग यंत्रणेत २ हजाराच्या १३ हजार ६०४ नोटा आढळन आल्या. व्यवहारात असलेल्या २ हजाराच्या एकूण नोटांमध्ये बोगस नोटांचं प्रमाण ०.०००६५३ टक्के इतकं आहे.