मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने ताब्यात घेतले आहे. गेल्या 8 तासांपासून ईडी त्याच्या चौकशी करत होती. पत्रा चाळ घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी आज रविवारी ईडीचे पथक सकाळी ७ वाजता राऊत यांच्या भांडुप येथील घरी पोहोचले.
ईडीचे पथक आल्यानंतर राऊत यांचे वकीलही त्यांच्या घरी पोहोचले. बाहेरही मोठ्या प्रमाणात समर्थक जमा झाले होते. ईडीने संजय राऊत यांच्यावर तपासात सहकार्य न केल्याचा आरोप केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांची याच प्रकरणात चौकशी सुरू होती. तसेच संजय राऊत यांच्यावर भाजपकडून या प्रकरणात अनेक आरोप झाले आहेत.
हे पण वाचा :
प्रोजेक्ट्स एंड डेवलपमेंट इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती, 59,700 पगार मिळेल
सुसाईड नोट लिहून अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमासृष्टी हादरली
अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, पण तो.. रामदास कदमांची घणाघात
सोने खरेदीदारांना झटका, सलग दुसऱ्या आठवड्यात वाढले इतके भाव?
त्यानंतर आज सकाळी सात वाजता ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी आणि विविध ठिकाणी पोहोचलं होतं. त्यानंतरच ईडीने संजय राऊत यांच्यावर हे कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातल्या राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संजय राऊत यांच्या ई़डी कारवाईवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने राज्यभर आंदोलन सुरू केलेली आहेत.