नुह : हरियाणात एक धक्कादायक घटना समोर आलीय. त्यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. हरियाणातील नूहमध्येही खाण माफियांकडून पोलीस उपअधीक्षकांना डंपरने चिरडल्याची दुर्घटना घडली आहे. सुरेंद्र बिश्नोई असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अवैध खाणकामावर छापा टाकण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे, त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मात्र खळबळ उडाली आहे.
हरियाणातील तवाडू येथे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र बिश्नोई सेवा बजावत होते. त्यावेळी त्यांना तवाडूच्या टेकडीमध्ये अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी छापा टाकरण्यासाठी तवडू टेकडीवर आपल्या निवडक पोलिसांसोबत गेले होते. त्यावेळी खाणकाम सुरु असलेल्या खाणीतून एक डंपर दगड भरून येत होता, त्यावेळी त्याला हात दाखवून डंपरला थांबवण्याच्या सूचना करण्यात आल्या, मात्र ड्रायव्हरने डंपर न थांबवता त्याच डंपरने पोलीस उपअधीक्ष सुरेंद्र बिश्रोई यांना धडक दिली, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
हे देखील वाचा :
मोठी बातमी ! शिंदे गटाकडून वरुण सरदेसाई यांची युवासेनेतून हकालपट्टी
सर्वसामान्यांसाठी खुशखबर..! ‘या’ ब्रँडचे तेल ३० रुपयांनी स्वस्त*
संजय राऊतांचा अमित शहांबाबत खळबळजनक दावा, म्हणाले..
वृत्तानुसार, पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र बिश्नोई हे तवडू येथे तैनात होते. त्याला बेकायदेशीर बातमी मिळाली होती, ती थांबवण्यासाठी तो गेला होता. डीएसपी सुरेंद्र बिष्णोई यांनी अवैध दगडाने भरलेला ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला असता खाण माफियांच्या लोकांनी डीएसपीवर डंपर फोडला. यामुळे डीएसपीचा जागीच मृत्यू झाला.