फुलगाव : फुलगाव येथील ओव्हर ब्रिज जवळील (चॅनल क्र.391) राष्ट्रीय महामार्ग क्र.06 वरील तसेच सर्विस रोडवरील अर्धवट स्वरूपाचे कामे असल्याने तसेच त्यांच्या निदर्शनास आणून सुद्धा पाठपुरावा करून सुद्धा दुर्लक्ष करत असल्याकारणाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत असल्याकारणाने दिनांक 21 जुलै रोजी रास्ता रोको ठिया आंदोलन व आत्मदहन करण्यात येणार आहे.
पत्राचा थोडक्यात आशय असा की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र.06 विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याची , सर्विस रस्त्याचे ब्रिज, गटारी विशेषतः 319 चॅनेल क्रमांक जवळील लाईट ,मोठे हॅलोजन ,बस स्टॅन्ड , गतिरोधक या कामाची अर्धवट लक्षणे दिसून येत असल्याने मागील काही महिन्यापासून युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील पाठपुरावा लेखी व भ्रमणध्वनी द्वारे प्रत्यक्षात भेटून अशा विविध माध्यमातून चालू असल्यावर सुद्धा या संपूर्ण कामाची अक्षरशः दुरवस्था झाली आहे तसेच केलेले ब्रिज गटारी यांचे कामे निकृष्ट दर्जाचे आहे याबाबत लेखी तक्रार करून सुद्धा एक ते दीड वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा संबंधित ठेकेदाराचे नाव ब्लॅकलिस्ट किंवा बिल थांबले नसून त्याला बिल देण्यात यावे याबाबत प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा,शैलेंद्र अवारे, अनिल गर्ग ,व संबंधित अधिकारी, यांना वारंवार सांगून सुद्धा फक्त दिशाभूल करून टाळाटाळ करत अजून ही करत आहे.
तसेच या अर्धवट कामामुळे काही शेतकऱ्यांचे चुकीच्या गटारी चेंबर यांचा पाण्याचा प्रवाह शेतात मोडल्याने लाखोचे नुकसान झाले असून. राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना मोडलेला बस थांबा व बस स्टॉप पुन्हा बांधून न दिल्याने विद्यार्थी नागरिक जेष्ठ नागरिक यांचे हाल होत असून सर्विस रोडवर बायपासच्या ठिकाणी लाईट व गतिरोधक व्यवस्था नसल्याने भरपूर अपघात होऊन काही लोक मृत्यू पावले आहे त्याचप्रमाणे अंडर बायपास मध्ये पाणी साचल्याने व पूल अरुंद असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारक व नागरिकांचे प्रचंड मानसिक,शारीरिक हाल होत असल्याने त्याबाबतचे लेखी निवेदन 15 जुलै 2022 ला देऊन सुद्धा प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा व संबंधित संपूर्ण अधिकारी वर्ग दुर्लक्ष करत असून जिल्हाधिकारी यांनासुद्धा पत्र दिले असून प्रशासनाने याबाबत अद्यापही दखल घेतली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.
हे देखील वाचा :
अरे बापरे.. खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकाला डंपरने चिरडले
मोठी बातमी ! शिंदे गटाकडून वरुण सरदेसाई यांची युवासेनेतून हकालपट्टी
सर्वसामान्यांसाठी खुशखबर..! ‘या’ ब्रँडचे तेल ३० रुपयांनी स्वस्त*
संजय राऊतांचा अमित शहांबाबत खळबळजनक दावा, म्हणाले..
म्हणून अशा आश्वासनाचे चॉकलेट देणाऱ्या प्रशासकीय व निम प्रशासकीय भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकारी विरोधात 21 जुलै सकाळी 11. वाजेला रास्ता रोको ,ठिय्या आंदोलन तसेच नुकसानग्रस्त शेतकरी नारायण लोणे हे आत्मदहन करणार असून निवेदन अर्जावर शेकडांच्या सह्या असून जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा व हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील ज्येष्ठ नागरिक ओंकार दगडू सोनार ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद जाधव ज्येष्ठ नागरिक नारायण लोणे ज्येष्ठ नागरिक बाळू शांताराम चौधरी , दीपक धनराज चौधरी,विद्यार्थी ओम बोरनारे,कमला सुतार , दिपाली पाटील , अक्षय शिंदे, भावेश चव्हाण, दिपांशू लोणे, पुष्कर पाटील तचेस संपूर्ण मिल्ट्री कॉलनी , पुष्पलता कॉलनी ,शिव कॉलनी संपूर्ण फुलगाव रहिवासी यांनी केले आहे.