जळगाव: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. नवीन सरकार स्थापन होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक कामे रखडली आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी शिंदे सरकारवर टोला लगावला आहे.
राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली आहेत तर अनेक ठिकाणी शेती पुराने वाहून गेली आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकारकडून कोणीही गेलेला नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना तातडीने मदत केली पाहिजे. पण सरकारकडे संवेदनशीलता राहिली नाही. 15 दिवस झाले हे सरकार जवेवणावळीत व्यस्त आहे. फाईव्हस्टार हॉटेलमद्ये आमदारांना घेऊन जाणं, जेवण देणं सुरू आहे. तिकडे फाईव्हस्टारमध्ये जेवण द्यायचे तर द्या. पण सर्वसामान्यांना दिलासा कोण देणार? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
हे पण वाचा..
जळगावात शिवसेनेला खिंडार, पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?
मोठी बातमी ! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
बाहेरून भाजीपाला खरेदी करीत असाल तर ‘हा’ Video नक्कीच पहा
एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत माझी अद्याप आमच्या कुठल्याही वरिष्ठांशी चर्चा झालेली नाही. मला याबाबत विचारण्यात आलेले नाही. मात्र ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचाच विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता होईल, असं त्यांनी सांगितलं.