वर्धा : तुम्ही जर बऱ्याच वेळा बाहेरून भाजीपाला खरेदी करीत असाल तर ही हा व्हिडीओ नक्कीच पहा. कारण एक भाजी विक्रेता चक्क गटाराच्या घाण पाण्यात भाजी धुवत असल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट शहरातील एका सूज्ञ नागरिकांने हा प्रकार समोर आणला असून हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान भाजी विक्रेत्याच्या या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल केला
https://twitter.com/ssidsawant/status/1548131875793018880
हा भाजी विक्रेता चक्क सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच्या पाण्यात भाजी धुवत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. गुरुवारी याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तीव्र संताप भाजी विक्रेत्यांबाबत व्यक्त करण्यात येत होता. अखेर शुक्रवारी याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली. हिंगणघाट नगरपालिकेचे प्रशासनक सतीश मासाळ यांनी पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित भाजी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला. हिंगणघाट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन घेतला आहे.
काय दिसलं व्हिडीओमध्ये?
सदर भाजीविक्रेता हा हिंगणघाट शहराच्या मनसे चौकातील असलेल्या नालीतून आपली भाजी धूत असल्याच कॅमेऱ्यात एका नागरिकाने कैद करून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केले होते. नालीत भाजी धुणारा भाजीविक्रेता हिंगणघाट शहराच्या डांगरी वार्डातील रहिवासी असून शुभम टामटे असं त्याचं नाव आहे.