जळगाव : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक ठिकाणच्या महापालिकेत नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशातच आता माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी आज राजीनामासत्र सुरू केल्याचे दिसून आले आहे.
जळगावचे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटाची साथ घेतली असून त्यांचा पहिल्याच टप्यात मंत्रीमंडळात समावेश होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, आमदार पाटील हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर धरणगावात शिवसेनेचा मेळावा देखील घेण्यात आला होता. तेव्हाच गुलाबभाऊ समर्थकांनी याकडे पाठ फिरवली होती. तर मध्यंतरी मतदारसंघातील सर्व महत्वाच्या पदाधिकार्यांनी आ. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांची सोबत कायम राखणार असल्याची ग्वाही दिली होती.
हे पण वाचा..
दिशा पटानी ‘हा’ बोल्ड अवतार पाहिलात का? पहा हे फोटो
शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?
मोठी बातमी ! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
बाहेरून भाजीपाला खरेदी करीत असाल तर ‘हा’ Video नक्कीच पहा
या अनुषंगाने आज शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील आणि शहराध्यक्ष राजेंद्र महाजन यांनी आपापल्या पदांचे राजीनामे शिवसेनाच जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. या पाठोपाठ आता जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदाधिकारी आपापल्या पदांचे राजीनामे देऊन आ. गुलाबराव पाटील यांच्या सोबत जाणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.