धुळे : आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. रितेश विलास सोनवणे (वय २२) रा. चांदसे ता. शिरपूर असं आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, दोन दिवसापासून बेपत्ता असतांना काल रोजी त्याने तापीत उडी घेतली. त्यानंतर घरच्यांनी शोध सुरु केला असताना आज तापीनदी पात्रात या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील पुलावरून तापी नदी पात्रात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. सावळदे पुलावर बॅग व कागदपत्रे आढळून आले त्यावरुन आत्महत्या करणाऱ्या तरुणाची ओळख निष्पन्न झाली
रितेश हा दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. काल सायंकाळी त्याने तापीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती त्याच्या कागदपत्रावरून मिळाली होती. रितेश सोनवणे याचा तापी नदीपात्रात शोध सुरु असताना आज सकाळी रितेशचा मृतदेह आढळून आला. मृत रितेश सोनवणे याचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. रितेश आयटीआयचे शिक्षण घेत होता तो दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला होता. मात्र, काल सायंकाळी नैराश्यातून मुंबईनैराश्यातून विद्यार्थ्याची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या; कागदपत्रांवरून झाला खुलासा-आग्रा महामार्गावरील सावळदे पुलावरून तापी नदीत पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समजताच शिरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हे पण वाचा :
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं हॉटनेसच्या ओलांडल्या सर्व मर्यादा ; पहा फोटो
या कारणावरून मुख्यमंत्री शिंदेंवर अनेकांनी व्यक्त केला संताप ; नेमका काय आहे प्रकार? पहा Video
ठरलं ! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ‘मविआ’कडून यांना तिकीट
मुख्यमंत्री न केल्याने फडणवीस नाराज? या निर्णयावरून उपस्थित होत आहेत प्रश्न
तापी नदीपात्रामध्ये आत्महत्या करण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सावळदे परिसरातील तसेच शिरपूर तालुक्यातील नागरिकांकडून तापी पुलावर काहीतरी उपाययोजना करावी जेणेकरून आत्महत्या करणाऱ्या लोकांना चाप बसेल अशी मागणी देखील आता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता या सर्व गोष्टींवर जिल्हा प्रशासन काय उपायोजना करतात हे देखील पाहणं तेवढेच महत्त्वाचं असणार आहे.