मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना आमदार राजन साळवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजन साळवी यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थिती आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर दुसरीकडे भाजप कडून कालच राहुल नार्वेकर यांचं नाव विधानसभा अध्यक्ष पदासाठी जाहीर करण्यात आलं आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक उद्याच होणार आहे. राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये ही पहिलीच लढाई होईल. संख्याबळा नुसार भाजपचे 106 आणि शिंदे गटाचे 50 आमदार आहेत. तर महाविकास आघाडी कडे शिवसेना 16, राष्ट्रवादी काँग्रेस 53 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्यामुळे यामध्ये नेमकं कोण बाजी मारत हे पाहायला हवं.
हे पण वाचा :
मुख्यमंत्री न केल्याने फडणवीस नाराज? या निर्णयावरून उपस्थित होत आहेत प्रश्न
CM एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेते पदावरून हटवलं ; उद्धव ठाकरेंकडून पत्र जारी
उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना मोठा दिलासा : ईडीपाठोपाठ आता सीबीआयने दिली क्लिन चीट
‘या’ निर्णयामुळे उस्मनाबादेत राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
राजन साळवी हे राजापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या सोबत 39 शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतरही राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही