मुंबई : दोन दिवसापूर्वी राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो, असं म्हणत शपथ घेतली. तर देवेंद फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मात्र यादरम्यान, राष्ट्रगीत सुरु असतानाच एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने उभे होते त्यावरून सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. यावरून अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे राष्ट्रगीत सुरु होत असतानाच हालचाल करीत असताना दिसत आहे. तर शेजारी राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहे.
https://www.facebook.com/reel/524105952838468?fs=e&s=cl