मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद गमावलेल्या उद्धव ठाकरेंच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आणखी एक अर्ज दाखल केला आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या नव्या याचिकेत शिवसेनेच्या 16 आमदारांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी, जेणेकरून आपली बाजू योग्य असल्याचे सिद्ध करता येईल, असे शिवसेना नेत्यांनी याचिकेत म्हटले आहे.
तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल राजभवनात शपथ घेतली. याच शपथविधीलाही शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. गुरुवारी रात्री शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी झाला तर शुक्रवारी सकाळीच शिवसेनेनं कोर्टात धाव घेत, हा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे न्यायालयात बाजू मांडतील.
हे पण वाचा :
ठाकरे सरकारला पहिला झटका ; सत्तेत येताच शिंदे सरकारकडून या दोन महत्त्वाच्या निर्णयात बदल?
चाळीसगाव तालुक्यात दोन चिमुकल्यांसह आईचा आढळला विहिरीत मृतदेह
ब्रेकिंग : एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीसांची मोठी घोषणा
’16 आमदार बहुमत चाचणीत नको’
शिवसेनेच्या वतीने आणखी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात 16 आमदारांवरील निलंबनाची कारवाई संदर्भातील याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे बहुमत चाचणीत या आमदारांना सहभागी होऊ देऊ नये, अशी याचिका शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी दाखल केली आहे. सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देतंय, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.